जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काॅरन्टाईन असलेल्या व्यक्तींच्या हातावर शाई लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच काॅरन्टाईन किंवा होम काॅरन्टाईन असताना बाहेर फिरणार्या लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान बाजारपेठेची वेळ बदलावी अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहे. तसेच सूचना देऊन सुद्धा आठवडा बाजारपेठ सुरू ठेवल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे, असाही इशारा यावेळी सामंत यांनी दिला. आज जिल्हा प्रशासनाशी श्री सामंत यांनी चर्चा केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.