छावा युवा संघटना सिधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर
सचिवपदी एकनाथ चव्हाण
०१ मे रोजी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून छावा युवा संघटना(महाराष्ट्र प्रदेश)ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले-पाटील यांनी जाहीर केली असून, जिल्हाध्यक्षपदी पत्रकार शैलेश मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर संघटनेचे महराष्ट्र प्रदेश सचिव मारुती पालांडे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले-पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश लोके यांच्या शिफारशीनुसार कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक राजेश ब्रीद यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी मावळ्यांना शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा कार्यकारीणी पुढीलप्रमाणे:-
कार्याध्यक्ष पत्रकार संजय पिळणकर, सचिव पदी (रक्तमित्र प्रतिष्ठानचे) एकनाथ चव्हाण, खजिनदार संतोष सातार्डेकर (माध्यमिक शिक्षक देवगड), संपर्कप्रमुख नयनेश गावडे (अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया गोवा सिंधुदुर्ग व्हाईस प्रेसिडेंट) निरीक्षक अजय सिंग, जिल्हा संघटक अमेय मडव, सहसचिव मदन मुरकर, जिल्हा उपाध्यक्ष, रविकांत चांदोस्कर, (कणकवली, देवगड, मालवण), जिल्हा उपाध्यक्ष रुपेश राणे,(कुडाळ, मालवण), जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव, (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग) यांची निवड करण्यात आली आहे.
छावा युवा संघटनेची ध्येये व उद्दीष्टे
३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरूषांनी समाजातील
विविध धर्मांच्या, जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये स्वराज्य निर्मीतीचा ध्यास निर्माण केला. बारा
बलुतेदार व अठरा पगड जातींमधील भेदभाव नष्ट करून सर्वांसाठी ‘मावळा’ हि जात निर्माण केली व सर्वसामान्य
रयतेचे स्वराज्य निर्माण केले.
त्यांच्या याच कार्याची प्रेरणा घेवून छावा युवा संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकाला ‘मावळा’ म्हणूनच
संबोधले जाते. कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ते असे न ओळखता मावळा बनूनच समाजसेवा अविरत सुरू आहे