You are currently viewing कणकवलीतील एकजुटीने जनता कर्फ्यू पहिल्या दिवशी यशस्वी

कणकवलीतील एकजुटीने जनता कर्फ्यू पहिल्या दिवशी यशस्वी

कणकवली

कणकवली नगरपंचायत व सर्वांच्या वतीने एकमुखी निर्णय घेत जाहीर केलेल्या कणकवली शहरातील जनता कर्फ्यू ला कणकवलीत 100% प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर अक्षरशा शुकशुकाट पसरला होता. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असल्याने होणारी गर्दी मात्र आज शनिवारी सकाळपासूनच बंद झाली. एखादे वाहन महामार्गावरून जातानाची घटना वगळली तर शहरात अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावरही चिटपाखरूही नव्हते. संपूर्ण कणकवली शहरात अक्षरशा शुकशुकाट पसरला होता. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे बंदला पाठिंबा देत जनता कर्फ्यू पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवला. कणकवलीतील नगरपंचायत चे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक, व्यापारी संघटना व सर्वानुमते घेण्यात आलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशीचे यशस्वी झाल्याने दिसून आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही कणकवली वासीयांचे आभार व्यक्त केले आहेत. कणकवली गडनदी पूल ते जानवली पुलापर्यंत फेरफटका मारला असता, रस्त्यावर असलेला शुकशुकाट हा या बंदची प्रचिती देत होता. शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा निर्मनुष्य झाले होते. या जनता कर्फ्यु मुळे कोरोना ची साखळी तुटण्यास मदतच होणार आहे. त्याचबरोबर गेले काही महिने प्रशासनावर असलेला ताण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. नियमित ड्युटीवर असलेले कर्मचारी, पोलीस यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा