You are currently viewing गोव्यात  कडक लॉकडाऊन; गोवा – महाराष्ट्र वाहतूक पूर्णपणे थांबली

गोव्यात  कडक लॉकडाऊन; गोवा – महाराष्ट्र वाहतूक पूर्णपणे थांबली

बांदा
गोव्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने गोव्यातून महाराष्ट्र राज्यात येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद असल्याने  बांदा-सटमटवाडी सीमा तपासणी नाक्यावर शुकशुकाट होता. मात्र गोवा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर वाहनांची कोणतेही अडवणूक करण्यात येत नसून केवळ नोंद घेऊन सोडण्यात येत आहे.
गुरूवार रात्रीपासून चार दिवस गोवा राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी  करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ तुरळक होती. गोवा-पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत नसून केवळ नोंदणी करून प्रवेश देण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज गोव्यात ये-जा करणाऱ्या नोकरदारांना कोणतीही आडकाठी करण्यात आली नसल्याने तरुणांमधून समाधान व्यक्त होत आहे. बांदा-सटमटवाडी येथे सीमा तपासणी नाक्यावर  तुरळक वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसानंतर आराम मिळाला आहे. अत्यावश्यक सेवेची वाहने नेहमीप्रमाणे सुरू होती.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा