You are currently viewing मिडिया विश्वावर शोककळा..

मिडिया विश्वावर शोककळा..

वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पत्रकारांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रोहित सरदाना यांना आज (30 एप्रिल) सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं. रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत करत होते. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि सहकार्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर 29 एप्रिललाही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचं आवाहन केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा