बंदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी…
कणकवली
दहा दिवस बाजारपेठ पूर्णतः: बंद राहणार असल्याने कणकवली बाजारात आज प्रचंड गर्दी झाली. बेकरी, किराणा दुकानांत तर पाय ठेवण्यासही जागा नव्हती. याखेरीज हार्डवेअर, कपडे, इलेक्ट्रीकल्स आदी दुकानेही ग्राहकांनी फुल्ल झाली होती. सर्वच ठिकाणी रेटारेटी असल्याने सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडाला. आज खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी गर्दी होती.
कोरोना रोखण्यासाठी कणकवली शहरासह तालुक्यातील सर्व गावांत १० मे पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनीही तसे आवाहन केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांवरही ग्रामनियंत्रण समितीची नजर असणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून कणकवली बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली. अनेक दुकानांमध्ये तर खरेदीसाठी झुंब्बड उडाली होती. तसेच वारंवार वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.