उपाध्यक्षपदी संकेत पोकळे तर सचिव स्वप्निल देसाई यांची निवड
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना दोडामार्ग अध्यक्षपदी सुयश राजेसाहेब राणे, उपाध्यक्ष पदी संकेत पोकळे तर सचिव पदी स्वप्निल देसाई यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असून शासन आपले सर्व निर्णय एखाद्या जी.आर मधून प्रसिद्ध करते. पण हे सर्व निर्णय आपल्या सर्वांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा अशा नियमांमुळे आपल्याला काम करताना विनाकारण त्रास होतो मग तो आर्थिक किंवा मानसिक पण असू शकतो. आपल्याला काम करताना सर्व प्रकारचे नियम पाळावे लागतात पण शासनावर असे काही निर्बंध नाहीत. उदा आपल्याला एखादे काम करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जातो जर आपण ते काम त्या कालावधीत पूर्ण केले नाही तर आपल्याला त्याचा दंड भरावा लागतो. पण हेच काम जर आपण वेळेत पूर्ण केले तर शासन आपल्याला त्याचा मोबदला वेळेत देतो का त्याच्या साठी कुठला कालावधी ठरवला आहे की नाही ? तसेच शासन आपल्या कामाचे साहित्य दर हे एस.एस.आर मधून प्रसिद्ध करते याच किंमती नुसार आपले टेंडर, इस्टिमेन्ट तयार केले जाते. पण जेव्हा एस.ए.स.आर तयार केला जातो तेव्हा त्या त्या कामाचा ठिकाणाचा विचार केला जात नाही. ठिकाण कोणतेही असो तिथले दर लक्षात घेतले जात नाहीत.
एस.एस.आर हा सर्वांसाठी एकच असतो पण साहित्य दर हे तिथल्या स्थळावर अवलंबून असतात आणि हे आपल्या दोडामार्ग मध्ये सगळ्याना चांगल्या पैकी माहिती असेल.
अशा अनेक अडचणी आपल्या सर्व अभियंता समोर आहेत. आपण फक्त कामामध्ये स्पर्धा करत राहतो आणि शासन आपल्याला खेळवत राहते आणि त्यामध्येच आपण संपतो. अशाच समस्यांच्या निराकरणासाठी एक संघटना आज राज्य स्तरावर काम करत आहे. जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्या सोडवायचा असतील तर आपले प्रतिनिधी या राज्य कमिटीत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला तालुका पातळीवर कमिटी करून त्यानंतर जिल्हा कमिटी केली जाईल आणि त्यातून आपले प्रतिनिधी राज्य कमिटी वर पाठवले जातील जेणेकरून आपल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार अडीअडचणी ह्या मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतील असे सुयश राणे यांनी सांगितले.