कुडाळातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन बेड उपलब्ध करा – संध्या तेरसे 

कुडाळातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन बेड उपलब्ध करा – संध्या तेरसे 

महिला भाजपाच्या वतीने तहसीलदारांकडे मागणी…

कुडाळ

येथील महिला व बाल रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या “कोविडे केअर सेंटर” मध्ये तात्काळ १० ऑक्सीजन बेड उपलब्ध करा,अशी मागणी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित सेंटर मध्ये कमी त्रास असलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. मात्र अचानक एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली. तर ओरोस येथील रुग्णालयात नेईपर्यंत उशीर होण्याची होऊ शकतो.त्यामुळे ऑक्सिजन बॅड उपलब्ध होईपर्यंत रुग्ण अत्यवस्थ होण्याची शक्यता असते.त्यामुळे या सेंटर मध्ये तात्काळ १० बेड उपलब्ध करा, असे म्हटले आहे.
यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, रणजित देसाई, नगरसेवक सुनील बांदेकर, जिल्हाचिटणीस बंड्या सावंत, शक्तिकेंद्र प्रमुख राजू पक्षी उपस्‍थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा