You are currently viewing भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना करोनाची लागण..

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना करोनाची लागण..

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा