सिंधुदुर्गनगरी
कोरोना बाधीत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका नागरिकांना माफक दरात व वेळेवर माहिती मिळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ॲम्ब्युलन्स कंट्रोलरुम कार्यान्वीत करण्यात आली आहे. कंट्रोल रुम कडून नागरिकांना त्यांच्या नजीक असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती पुरवण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे चोवीस तास ही कंट्रोल रुम कार्यान्वीत असणार आहे. सदर कंट्रोल रुमचा संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. 02362-229020 आणि मोबाईल क्रमांक – 9359788334 या क्रमांकावर नागरिकांना 24 तास संपर्क साधता येणार आहे.
ज्या नागरिकांना खाजगी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे, त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळील रुग्णवाहिका चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक देण्यात येईल. रुग्णवाहिकांसाठी पुढील प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मारुती व्हॅनसाठी 25 किलोमीटर किंवा 2 तासाकरिता 750 रुपये व 25 कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. 14 रुपये, टाटा सुमे, मारुती ईको, मॅटॅडोर सदृष्य वाहनासाठी 25 कि.मी. किंवा 2 तासाकरिता 900 रुपये व 25 कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. 14 रुपये, टाटा 407, स्वराज माजदा, टेम्पो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि.मी किंवा 2 तासांसाठी 1 हजार रुपये व 25 कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. 20 रुपये व आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि.मी. किंवा 2 तासाकरिता 1 हजार 200 रुपये व 25 कि.मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. 24 रु. या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.