मालवण तालुक्यात 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

सिंधुदुर्गनगरी : 

मालवण तालुक्यातील 9 ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. लागू करण्यात आलेले कंटेन्मेंट झोन आणि किती तारखेपर्यंत कंटेन्मेंट झोन राहणार याची माहिती पुढील प्रमाणे आहे. मेढा-मालवण येथील घर क्र. 129 येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत पाईप मधील घर क्र. 290 A येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजीपर्यंत, जामडूल येथील घर क्र. 1756 येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत पेंडूर-देऊळवाडी मधील घर क्र. 209 येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत वायरी-भुतनाथ जाधववाडी मधील घर क्र. 255 येथे 20 सप्टेंबर रोजी पर्यंत, ग्रामपंचायत कुंभारमाठ मधील घर क्र. 410 येथे 20 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत हिवाळे मधील घर क्र. 460 अ येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत तिरवडे मधील घर क्र. 79 सी, येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजीपर्यंत, ग्रामपंचायत वायरी-भुतनाथ मधील घर क्र. 216 येथे दिनांक 21 सप्टेंबर 2020  कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.

       सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या तारखांपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी यांना व त्यांच्या वाहनांना लागू राहणार नाही. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1952 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा