You are currently viewing पंतप्रधान मोदी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ..

पंतप्रधान मोदी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं निधन..

अहमदाबाद :

कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबावर सुद्धा कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. नर्मदा बेन यांचे पती जगजीवनदास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिल दामोदरदास मोदी यांचे धाकटे भाऊ होते.

नर्मदाबेन या गेल्या 10 दिवसापासून शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी माहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =