You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी दिले देवगड ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर भेट

आमदार नितेश राणे यांनी दिले देवगड ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर भेट

देवगड

आपत्कालीन काळात कोविड पेशंटला उपयोगी पडावेत म्हणून आमदार नितेश राणे यांनी पोर्टेबल ऑक्सीजन सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता. हे सिलेंडर आज देवगड ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आले.आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या सिलेंडरमुळे पेशंटचा जीव वाचणार आहे.आपत्कालीन स्थितीमध्ये अतिशय वापरायला सोपा असणारा हा सिलेंडर कोणत्याही ट्रेनिंग शिवाय वापरता येतो.

आमदार नितेश राणे यांनी असे १०० सिलेंडर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले आहेत. देवगड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विटकर यांचेकडे हे सिलेंडर सोपवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, सभापती रवी पाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक निरज घाडी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, बांधकाम सभापती बापू जुवाटकर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस कर माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा