You are currently viewing नगरसेवक चांदोस्कर, कणेरकर यांनी दिले १०८ रुग्णवाहिकेला स्वखर्चाने टायर

नगरसेवक चांदोस्कर, कणेरकर यांनी दिले १०८ रुग्णवाहिकेला स्वखर्चाने टायर

देवगड

कोरोना महामारीच्या साथीत रुग्णांना उपचारासाठी पुढे हलविण्यात ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका)हा महत्त्वाचा घटक आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयाची 108 एम्बुलेंस टायर निकामी झाल्यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत होती. देवगडचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर व उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी सामाजिक भान राखत आपल्या स्वखर्चाने या १०८ रुग्णवाहिकेला नवीन टायर उपलब्ध करून दिले आहेत.

हे टायर आज त्यांनी सुपूर्त केले आहेत पेशंटना ग्रामीण भागातून आणायला व जिल्हास्तरावर हलवायला 108 एम्बुलेंस सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देवगड हे भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या एका टोकाला असलेले गाव असल्याने ॲम्बुलन्स ची गरज लागणार हे निश्चित 108 एम्बुलेंस चे टायर खराब झाले. यामुळेही अँब्युलन्स वापरण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात हे लक्षात आल्यावर योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांनी सुमारे 24 हजार रुपये खर्च करून त्या गाडीला लागणारे चारही टायर दिले आहेत.

यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, सभापती रवी पाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक निरज घाडी, बांधकाम सभापती बापू जुवाटकर, वैदयकीय अधिक्षक डॉ. विटकर, भाजप जिल्हाउपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, ज्ञानेश्वर खवळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा