You are currently viewing खोक्रल ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी कृती समिती पुनर्गठित….

खोक्रल ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाला रोखण्यासाठी कृती समिती पुनर्गठित….

दोडामार्ग

खोक्रल ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कोरोनाला आळा घालण्यासाठी ७ सदस्यांची कृती समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.दरम्यान आज झालेल्या बैठकीत गावाच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच देवेंद्र शेटकर, उपसरपंच गोपाळ नाईक, तलाठी कांचन गवस, ग्रामसेवक विशाल जाधव, पोलीस पाटील विलास शेटकर व इतर ग्रा. पं. सदस्य, आशासेविका व आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. या चिंतेवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कृती समिती अग्रेसर होताना दिसते. याच कृती समितीच्या साथीने खोक्रल ग्रामपंचायत ने कोरोनाला सीमेवरच रोखण्याचा विडा उचलला आहे. ग्रामपंचायतच्या नव्याने गठीत कृती समितीने कोरोनापासून संरक्षणासाठी नियमावली व उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम बाबी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी उगाचच गर्दी न करणे, अंतर ठेऊन बोलणे, मास्कचा वापर करणे व आवश्यक तेव्हा सॅनिटायझरचा वापर करणे आदींसह विशेष संदेश ग्रामस्थांना दिले जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा