You are currently viewing कणकवलीची मृणाली पिळणकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

कणकवलीची मृणाली पिळणकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

कणकवली

शहरातील पिळणकरवाडी येथील मृणाली पिळणकर या विद्यार्थिनीने अनुभव युथ सेंटर मुंबई-गोरेगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊनमधील स्त्री” या विषयावरील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत’ राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दरम्यान मृणालीने जनजागृती गीत सादरीकरण स्पर्धेमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर गीत सादर केले. त्यातही तिने पारितोषिक प्राप्त केले. मृणाली ही सध्या बॅचलर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेत असून ती एक गुणवंत विद्यार्थी म्हणून परिचित आहे. कणकवली कॉलेजला असल्यापासून तिने निबंध-वक्तृत्व आणि गायन या स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवायला प्रारंभ केली. सध्या या कोरोना काळात तिने विविध कलांच्या ऑनलाइन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन वरच्या क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत.
त्याचबरोबर मृणाली ही कविता आणि वैचारिक लेखन लहान वयातच करत असून विविध वृत्तपत्रात तीच सदर लेखनही चालू आहे. समाजातील दिसणाऱ्या व्यंगावर बोट ठेवून ती मार्गदर्शक विचार देणारे लेखन करत असते.त्याचबरोबर जगण्यातील समंजसपणा हा सुद्धा तिच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. या तिच्या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य-संस्कृती चळवळीतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा