जि.प. अध्यक्ष सौ संजना सावंत यांचे यशस्वी प्रयत्न
वैभववाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेला भुईबावडा घाट कोल्हापूर प्रशासनाने रविवारी सकाळी पूर्ववत केला आहे. करूळ व भुईबावडा हे तळकोकणातून जाणारे प्रमुख घाटमार्ग आहेत. कोकण व घाटमाथा यांच्या मधील प्रमुख दुवा म्हणून या घाटांकडे पाहिले जाते. बंद केलेला भुईबावडा घाट तात्काळ चालू करा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या समवेत याबाबत त्यांनी चर्चा केली. मार्ग बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सदर घाट चालू असणे फार आवश्यक आहे. असे सौ. सावंत यांनी सांगितले होते. कोल्हापूर प्रशासनाने हा मार्ग अखेर रविवारी सकाळपासून पूर्ववत केला आहे.