सावंतवाडी
येथील पालिकेचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज पासून तीन दिवस पालिका कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. सोमवार पासून ते पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे नगरसेवक आनंद नेवगी यांनी सांगितले. संबंधित कर्मचाऱ्याचा रिपोर्ट काल संध्याकाळी प्राप्त झाला होता. त्यानंतर तीन दिवस पालिका कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवार पासून पुन्हा कामकाज चालू होणार असल्याचेही नगरसेवक श्री नेवगी यांनी सांगितले. दरम्यान नगरपालिकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचार्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे,असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.