कुडाळ येथील कोव्हिडं सेंटरला पुरविल्या पाणी बाॅटल..
कुडाळ
पणदूर गावचे सरपंच तथा भाजपा चे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल हे आज कुडाळ येथील कालच सुरू झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये पणदूर गावातील कोव्हिडं पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या नव्यानेच चालू झालेल्या कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये काही कमतरता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे. या ठिकाणी बसविण्यात आलेले पाणी शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित न झाल्याने दाखल असलेल्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट त्यांनी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे यांच्या कानावर घातली. त्यानंतर सौ.संध्या तेरसे यांनी कोविड यांनी तात्काळ कोविड सेंटरला भेट देत पेशंटसाठी २०० बॉटल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली.
जिल्हा प्रशासन गेले वर्ष भर या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करणार असे सांगत आहे आणि आज कोविड पेशंट एडमिट झाल्यावर पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा पेशंटना उपलब्ध नाही खुपच खेदाची बाब आहे.
सौ तेरसे यांनी कोविड सेंटरला ड्युटीवर असलेल्या दुधगावकर मॅडम शी संपर्क साधत तालुक्यातील येणाऱ्या पेशंटसाठी काही आवश्यक असल्यास सांगा आम्ही आमची जबाबदारी म्हणून नक्कीच सहकार्य करु असे आश्वासन दिले. त्यावेळी नगरसेवक सुनिल बांदेकर उपस्थित होते