कोरोनाच्या झालेल्या विस्फोट स्थिती आता वेगवेगळ्या पक्षातही आपसात मतभेद निर्माण होताना दिसते आहे. कोरोनाचा स्फोट झालेला असताना मोदी – शाह बंगालमध्ये मोठमोठ्या गर्दीच्या सभा घेतायत, त्यावर आज भाजपच्या प्रवक्त्यानेच भाजप जोरदार टीका केली.
*काय म्हणाल्या भाजप प्रवक्त्या रितू रावत?*
भारत समाचार नावाचं हिंदी न्यूज चॅनल आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसच इतर हिंदी राज्यात ते जास्त बघितलं जातं. याच चॅनलवर कोरोना आणि ऑक्सिजनच्या स्थितीवर चर्चासत्र आयोजीत करण्यात आलं होतं. त्यात भाजपच्या प्रवक्त्या रितू रावत सहभागी झाल्या होत्या. त्याच चर्चासत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजप सरकारवरच टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या की, ऑक्सिजनचा दुष्काळ आहे, औषधांच्या किंमती वाढवल्यात. एवढच नाही तर लोक मरतायत, तुम्हीच सांगत होतात की, अंतर ठेवा मग तुम्हीच ते का नाही पाळलं, का निवडणुका घेतल्या? जर ह्या पृथ्वीवर माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? सरकारही बनणार, निवडणुकाही होणार तर त्याची एक वेळ असली पाहिजे ना? माझ्या ह्या भूमिकेवरुन जर भाजपनं मला काढून टाकलं तर टाकू द्या, मला ह्याचा त्रास होतोय, मी लोकांची वेदना वाटू शकते.
रितू रावत यांनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्यानंतर इतर प्रवक्त्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. खुद्द चर्चा घडवणाऱ्या अँकर्सनेही तुम्हाला नमन करत असल्याचं सांगितलं. रितू रावत यांचा हा व्हिडीओ माजी IAS अधिकारी सूर्य प्रताप सिंग यांनी ट्विट केला आहे. अजून तरी रितू रावत यांच्यावर कुठली कारवाई झाल्याची माहिती नाही. रावत यांच्या भूमिकेवर भाजपात मात्र शांतता आहे. तीन दिवसांपुर्वी ही डिबेट झालेली होती. रितू रावत ह्या आक्रमक भाजप नेत्या म्हणून ओळखल्या जातात.