या वाहनाचे महीनाभराचे ७५ हजार रुपयांचे भाडे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द
सावंतवाडी
रायगड जिल्ह्यातील विधंने पंचक्रोशीतील माऊली वारकरी मंडळाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील कोविड रुग्णांना ने-आण करण्यासाठी एका महिन्याकरिता गाडी भाड्याने घेण्यासाठी ७५ हजार रुपयांची रोख रक्कम तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केली आहे त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय काही प्रमाणात दूर होईल असा विश्वास तहसीलदार म्हात्रे यांनी व्यक्त केला
गतवर्षी कोविड महामारी सुरू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील विधंने पंचक्रोशीतील माऊली वारकरी मंडळाने सावंतवाडी तालुक्यासाठी लागणारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता असे तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले.
मागच्या वर्षी जीवनावश्यक वस्तू दिल्यानंतर यंदा रुग्णांची वाढ वाढत आहेत आणि यावेळी रुग्णांना ने आण करण्यासाठी आरोग्य विभागाकडे वाहनांची कमतरता भासत आहे त्याकरता एक भाड्याने वाहन घेऊन रुग्णांची गैरसोय दूर करावी यासाठी माऊली वारकरी मंडळाने ७५ हजार रुपयांची रोख रक्कम तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तातडीने वाहन उपलब्ध करून रुग्णांसाठी सज्ज ठेवले आहे असे ते म्हणाले. माऊली वारकरी मंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांनी सावंतवाडी तालुक्याच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले आहेत. कोविड काळामध्ये विविध प्रकारची मदत करून प्रशासनाला जना सहकार्य करत आहे. माऊली वारकरी मंडळाने पहिल्या टप्प्यात धान्य दिले तर आता दुसर्या टप्प्यात रुग्णांना ने आण करण्यासाठी भाड्याचे वाहन उपलब्ध करून दिले.त्यासाठी एक महिन्याची भाड्याची ७५ हजार रुपयांची रक्कम दिली आहे, हे मोठे योगदान आहे असे देखील तहसीलदार म्हात्रे म्हणाले.