महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने कोरोना महामारीचे विषाणुचे उद्रेकाचे पार्श्वभुमिवर उपाययोजनांबाबत मर्यादीत उपस्थिती व covid-19 उपचारासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात ” महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा ” सक्तीने लाभ देण्याचे आदेश व्हावेत तसेच covid-19 या आजाराचा समावेश वैद्यकीय देयक प्रतिपुर्ती शासन निर्णयात करण्यात यावा या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी के.मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. काही महसुल अधिकारी / कर्मचारी असिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्त आढळुन आलेले आहे. व कर्मचारी यांचे कुटुंबीय देखील कोरोनाग्रस्त आढळुन आलेले आहेत. व इतरत्र काही कर्मचारी यांचा दुर्दैवाने मृत्युदेखील झालेला असून त्यांचे कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये / कार्यालयामध्ये काही कोरोना ग्रस्त आढळून येत आहेत. अशावेळी स्वतःची आणि कुटुंबियांची खूप काळजी घेणे गरजेचे झालेले आहे. कोरोना चा प्रसार होणे पासुन आणि त्यापासून बचाव होण्याकरता सुरक्षित तेचा एक भाग शासनाकडुन जनसंपर्क कमी व्हावा याकरिता वेगवेगळया उपाययोजना करणेत येत असून शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात ” Mission begin again” या अंतर्गत राज्य शासकीय कार्यालयातील ” महाराष्ट्र राज्यातील इतर भागातील कर्मचा-यांची उपस्थिती एकुण पदसंख्येच्या 50 % किंवा किमान 50 कर्मचारी यांपैकी जास्त असेल तितकी असेल ” शासन निर्णय आहे. लोकांचा संपर्क टाळणे हाच समाजाला कोरोना च्या विळख्यातुन वाचविण्यासाठी प्रभावी इलाज आहे. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी होवून तसे आदेश पारित होणेस विंनती केली आहे.
तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडील वैद्यकीय प्रतिपूर्ती शासन निर्णयात समाविष्ट आकस्मिक आजारात ह्या Covid 19 आजारावर उपचार उपलब्ध नाही त्याच्या उपचारासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसत असून त्यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे. तरी महोदयांना विनंती करण्यात येते की covid-19 उपचारासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात ” महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा ” सक्तीने लाभ देण्याचे आदेश व्हावेत तसेच covid-19 या आजाराचा समावेश वैद्यकीय देयक प्रतिपुर्ती शासन निर्णयात करण्यात याबाबत विनंती संघटनेच्या वतीने केलेली आहे. स्वतःची आणि आपल्या प्रिय कुटुंबीयांची काळजी घ्या काळजी करु नका .आणि सुरक्षित रहा. असे आवाहनही संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान माळवे यांनी केलेले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे शिल्पा तेरसे उपाध्यक्ष, शाम लाखे कोषाध्यक्ष, अशोक पोळ संघटक, स्वप्निल प्रभु प्रसिध्दी प्रमुख, सुगंधा इंगळे वगैरे पदाधिकारी उपस्थित होते.