You are currently viewing पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल जाहीर ….

पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल जाहीर ….

 भोसले पॉलीटेक्निकचे यश

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकने आपली उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
कॉलेजच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल 99 टक्के लागला असून यामध्ये पूर्वा देवरुखकर 95% हिने प्रथम, प्रांजल गवस 92% द्वितीय तसेच तन्वी लंगवे व अक्षय जडये 87% यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला
मेकॅनिकल विभागाचा निकाल 98% लागला असून शुभय डोंगरे 98% याने प्रथम, अमन शेख 96% द्वितीय व अर्जुन मोर्जे 95% याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल 95 टक्के लागला असून रेणुका भोगण 94% हिने प्रथम, समता पाटील 92% द्वितीय व दत्ताराम राऊळ 90% याने तृतीय क्रमांक पटकावला.
कॉम्प्युटर विभागाचा निकाल 90% लागला असून अनंत पडवळ 99% याने प्रथम, युक्ता नाईक 98% द्वितीय व वैष्णवी परब 97% हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले, विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा