You are currently viewing जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी दिली मोरगाव प्रा.आ.केंद्राला भेट

जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी दिली मोरगाव प्रा.आ.केंद्राला भेट

दोडामार्ग तालुक्यात वाढते कोरोना रुग्ण व उपाय खबरदारी घ्या : सौ.संजना सावंत

दोडामार्ग:.
दोडामार्ग तालुक्यातील वाढते कोरोना रुग्ण व लस उपलब्धता आदी विषयाचा आढावा घेऊन सबधितांना उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिल्या
मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर अधिकारी वर्गाकडून उपलब्ध लस व कर्मचारी वर्ग व अडचणी आदीचा आढावा घेतला यावेळी जि प उपाध्यक्ष राजन म्हापसेकर समाजकल्याण सभापती अंकुश जाधव बांधकाम सभापती महेश चव्हाण महिला बालकल्याण सभापती शर्वणी गावकर सावंतवाडी सभापती निकिता सावंत जि प सदस्या श्वेता कोरगावकर डॉ करतस्कर डॉ अंधारे आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील लसीकरण बाबत तातडीने गावावर सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संपर्क साधून सहकार्य घ्यावे व ग्रामीण भागातील जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना केल्या. दोडामार्ग तालुक्यातील समस्यांबाबत पुन्हा भेट देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला ग्रामीण भागात जास्त लसीकरण होण्यासाठी सर्वाचं सहकार्य अपेक्षित आहे याबाबत म्हापसेकर साहेबांचे सहकार्य घेऊन तालुक्यातील जनतेला लस उपलब्ध करून देण्याबाबत अडचणी सोडविण्यात येतील असे स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुक्यात लसीकरण भेडशी तलकट मोरगाव आदी ठिकाणी उपलब्ध आहे नेटवर्क सुविधेअभावी आयी आरोग्य केंद्रात अडचणी येत आहे तालुक्यात नेट वारंवार नसल्याने लसीकरण करण्यात अडसर ठरत आहे. आतापर्यत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत यामध्ये 6 जिल्हा रुग्णालयात तर15 आयटी 15 सावंतवाडी 1 एस पी एम तसेच 126 घरी विलगिकरण आहेत दोन दिवसापूर्वी दोन जण तर काल एका युवकांचा मुत्यू झाल्या ने प्रशासन अलर्ट झाले आहे सद्यस्थितीत 170 लस उपलब्ध असून उर्वरित लस पुरवठा करण्यासाठी आज गाड्या पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता भाडे तत्वावर घेण्या बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबत पालकमंत्री यांनी खनिकर्म विभाग यांच्या निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध होणार असे सांगितले तरी लवकर मिळणार नसल्याने कार्यवाही करण्यात यावी मंजूर पदे तातडीने भरण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या, यावेळी जनतेने लसीकरणासाठी बाहेर पडून लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा