जिल्हा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सात वर्ष वेंगुर्लेत कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर नाही
जि. प. सदस्य दादा कुबल यांचा अध्यक्षांसमोर आरोप
वेंगुर्ला
जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाबत आढावा घेतला. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी 2014 साला पासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर नाही. या समस्येबाबत अनेक वेळा पाठपुरावा करू नये थातुरमातुर उत्तरे देऊन बगल देण्यात येते. कोरोना काळात येथे कायमस्वरूपी डॉक्टर असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली. यावर बोलताना जि.प. अध्यक्ष सौ. सावंत यांनी लवकरच एक तरी डॉक्टर वेंगुर्ला साठी मीळावा यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज जि. प. अध्यक्ष सौ. सावंत यांनी वेंगुर्लेत भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलिफे उपस्थित होते. वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर- सामंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. डवले यांच्या कडून त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. कोरोना लस साठा संपला आहे तो आल्यानंतर प्रत्येकाला लस द्यावी असे त्यांनी सांगितले.
या आढाव्या दरम्यान जि प सदस्य दादा कुबल आरोग्य यंत्रणेबाबत आक्रमक झाले. वेंगुर्लेत आरोग्य सोईची दयनीय अवस्था त्यांनी मांडली. कायम स्वरूपी डॉक्टरांची कमतरता आहे. सन 2014 पासून सतत करतोय पाठपुरावा करतो आहे, तरी पण डॉक्टर मिळालेला नाही. शहरातील कोरोना केअर सेंटर ग्रामीण रुग्णालयापासून दोन ते तीन किमी आहे. १०८ ला फोन लागत नाही आणि लागला तर तात्काळ कार्यवाही होत नाही.
उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण आहे. तिचा उपयोग केअर सेंटर साठी केला पाहिजे होता. असे जि प सदस्य दादा कुबल यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र या इमारतीचे फायर ऑडिट झाले नाही आणि एम एस सी बी चा मीटर येणे बाकी आहे. त्यामुळे इमारत वापरली नसल्याचे डॉक्टर मणचेकर यांनी सांगितले. दरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील एकूणच आरोग्य व्यवस्था याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन यांची एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे सौ. सावंत यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुक्याला किमान २ रुग्णवाहिका द्या अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी केली. तसेच आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका नाही त्यामुळे तेथे रुग्णवाहिका मिळावी असे त्यांनी सांगितले. यावर अध्यक्षांनी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर व्हॅन भाडेतत्वावर घ्या, याबाबत पालकमंत्री यांच्याशी झाली आहे. व्हॅनचा कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी जि प सदस्य प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, भूषण आंगचेकर, समीर कुडाळकर आदी होते उपस्थित होते.