कणकवली रेल्वे स्थानक येथील आरोग्य पथकासोबत घेतला आढावा; आपल्या समोरच एका चिमुकल्याची केली रॅपिड टेस्ट..
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी कणकवली रेल्वे स्टेशन येथील आरोग्य पथकाच्या ठिकाणी स्वतः भेट दिली. मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची कशा प्रकारे तपासणी होते? त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व पथकातील कर्मचारी कोणकोणती माहिती गोळा करतात? संशयितास आढळल्यास त्याची रॅपिड टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल किती मिनिटात येतो? याचं स्वतः समोरच प्रात्यक्षिक एका लहान मुलांची रॅपिड टेस्ट करुन घेत केले. तसेच तालुक्यातील कोव्हीड सेंटर मध्ये किती बेड आहेत आणि सध्याच्या स्थितीत किती रुग्ण दाखल आहेत,याचाही आढावा आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतला आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ .संजय पोळ, डॉ. कांदे, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.