देशातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबई :
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता जगभरात अनेक परीचे उपाय योजना केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतानाचे दिलात आहे. काल देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे ९५,७३५ रुग्ण सापडले आहे.
आतापर्यंत देशात एवढे रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आखडा आहे. तर मृतांची संख्या देखील प्रचंड वाढत असून काल एका दिवसात जवळजवळ ११७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मृतांचा आकडा प्रचंड वाढल्याने आता याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ४४ लाख ६५ हजारांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ४४,६५,८६४ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ७५,०६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत ३४,७१,७८४ रुग्ण बरेही झाले आहेत. तर सध्या ९,१९,०१८ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.