सावंतवाडी
सावंतवाडीच्या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये नव्या रुपात आनंदी, संस्कारी, आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी महत्वाचं पाऊल उचलल आहे. उत्तम आणि आदर्श विद्यार्थी घडवण्याची परंपरा जपणाऱ्या कळसुलकर शाळेने आता आपली बालवाडी आनंद शिशु वाटिका नावाने बालवाडी सुरु केली आहे. या बालवाडीत छोट्या बच्चे कंपनीला आनंदी वातावरणात, उत्तम संस्कारात, हसत खेळत शिकवण्यात येईल. तसेच यात बाल ग्रंथालय, विविध खेळणी, बगीचा, संस्कारक्षम कार्यक्रम, आरोग्यविषयक खबरदारी, अनुभवी शिक्षक आणि ज्ञानाचा खजिना ही या आनंद शिशु वाटिक केची बलस्थाने, वैशिष्ट्ये आहेत.
⁰
या बालवाडीसाठी प्रशालेचा परुळेकर हॉल नव्याने रंगवण्यात, सजवण्यात आला असून तो आकर्षण ठरत आहे. शाळेचं व्यवस्थापन ही शिशु वाटिका अधिकाधिक सक्षम, सुविधाजनक बनवण्याकडे लक्ष ठेवून आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी शाळा म्हणून कळसुलकर शाळेचं नाव आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्तूंग भरारी घेतली, यश प्राप्त केलं, मानसन्मान मिळवला आणि आपल्या बरोबरच शाळेचं नाव ही उज्ज्वल केलं आहे. त्यामुळे या नाविन्यपूर्ण अशा आनंदी शिशूवाटीकेत सावंवाडीतील पालकांनी आपल्या पाल्यांना दाखल करावे आणि आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल बनवावे असे आवाहन करण्यात आले आहे.