सिंधुदुर्गनगरी
जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता झूम मिटींगव्दारे मोफत मार्गदर्शन वेबीनार आयोजित केलेला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नागरिक, पालक, उच्चव्यावसायिक इत्यादींनी वेबीनारमध्ये सहभागी होवून मार्गदर्शन घ्यावे.
12 वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी उच्चव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी NEET,JEE,NATA,CET अशा सामाईक प्रवेश परीक्षा देतात. वैद्यकीय,अभियांत्रिकी, आर्कीट्रेक्चर, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन,कृषी,Animal Husbandry,Fishery Science,Dairy Technology, L.L.B, B.F.A, पदवीनंतरच्या MBA,MMS,MCA,LLB इ. अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थीना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येते.मात्र अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता झूम मिटींगव्दारे मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन केले आहे. Join Zoom Meeting साठी Meeting ID : 89483038237 व Passcode : xQfWQ5 असा आहे.
जॉइन झूम मिटिंग लिंक पुढील प्रमाणे आहे.
https://us05web.zoom.us/j/89483038237?pwd=UW9rZFJCOElJZmRQZnFIeVRrQXQ3UT09 अशी आहे.
तसेच तक्रार निवारण दिन झूम ॲपव्दारे वेबिनार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजीत केलेला आहे. या Zoom Meeting साठी Meeting ID : 87338054088 व Passcode : AuV8Pmअसा आहे.
जॉइन झूम मिटिंग लिंक पुढील प्रमाणे आहे.
https://us05web.zoom.us/j/87338054088?pwd=OWoxTFVHMmtPZzk1SFZ1THFnSUsrUT09 अशी आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोध जाधव यांनी केले आहे.