सिंधुदुर्गनगरी
कणकवली शहरात 17 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. बाजारपेठ येथे दोन ठिकाणी 28 एप्रिल पर्यंत, बिजली नगर, भैय्या नाईक चाळ येथे 27 एप्रिल पर्यंत, कामत सृष्टी इ विंग येथे 27 एप्रिल, मारुती आळी सिंधु प्रथमेश बिल्डिंग येथे 29 एप्रिल पर्यंत, नाथ पै नगर येथे 28 एप्रिल पर्यंत, शिवाजी नगर गल्ली नं. 1 येथे 28 एप्रिल पर्यंत, सिद्धार्थ नगर येथे दोन ठिकाणी 27 एप्रिल पर्यंत, टेंबेवाडी येथे 27एप्रिल पर्यंत 2 आणि 28 एप्रिल पर्यंत 1 असे तीन ठिकाणी, सोनेवाडी – सरस्वती अपार्टमेंट येथे 28 एप्रिल पर्यंत, तेली आळी येथे 27 एप्रिल पर्यंत 1 आणि 28 एप्रिल पर्यंत 1 असे दोन ठिकाणी, विद्यानगर येथे 27 एप्रिल पर्यंत , कणकवली नगर सिंधुलक्ष्मी अपार्टमेंट येथे 28 एप्रिल पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.