You are currently viewing कुडाळ आगारातील मनमानी कारभाराविरोधात भाजप आक्रमक

कुडाळ आगारातील मनमानी कारभाराविरोधात भाजप आक्रमक

कुडाळ  :

कुडाळ आगारातील मनमानी कारभारावर आज भाजप पदाधिकारी आक्रमक बनले.एस. टी आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक राऊळ यांना जाब विचारला.

कोरोना महामारीच्या कालावधीत कुडाळ आगारातील प्रशासन व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य सुसंवाद नसल्याने प्रवाशी भरडले जात असून कुडाळ तालुक्यातील गोरगरीब प्रवासी जनतेचा आपल्यावरील विश्वास उडत चालला आहे. खेडयापाडयातील प्रवासी आता खाजगी वाहतुकीचा आधार घेत असल्याचा आरोप केला आहे. कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन व्हायला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना ५ एप्रिल रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू राहणार असल्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. संपुर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी सायंकाळ पासुन सोमवार सकाळ पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे आपण शुक्रवारी सायंकाळीच वस्तीला गेलेल्या सर्व गाडया पुन्हा आगारात आणल्यात याबाबत माझे कोणतेही म्हणणे नाही परंतु त्याबरोबरच पुन्हा त्या गाडया रविवारी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पाठवून सोमवारचे वेळापत्रक पुर्वीप्रमाणे राबवले पाहीजे होते. हि बाब निकडीची होती परंतु आगार व्यवस्थापक म्हणून आपण तसे नियोजन न करता सलग आलेल्या सुट्टयाचा फायदा होत रजेवर गेलात व सहायक वाहतुक नियंत्रक यांच्याकडे कारभार सोपवल्या असल्याचे सांगुन मला त्यांच्याशी संपर्क करायला सांगितलात. कोरोना महामारीच्या कालावधीत आरोग्य,पोलिस यंत्रणा रात्रदिवस काम करत आहे हे आपण पहात आहातच हि सर्व मंडळी नोकरी म्हणून नाही तर एक मिशन म्हणून जिवावर उदार होऊन काम करताना दिसत आहेत. मी सहायक वाहतुक निरीक्षक श्री.राऊळ यांना संपर्क केला असता त्यांनी आगार व्यवस्थापकांनी अजुन काय सांगितले नाही ते सांगणार तसे आम्ही करणार असे नेहमीच्या पढडीतील उत्तर दिले. एस.टी.वाचली पाहीजे यासाठी सर्वच स्थरावर प्रयत्न सुरू आहेत लॉकडाऊन कालावधीत एस.टी.महामंडळाने अत्यावश्यक सेवेसाठी म्हणुन मालवाहतुक सुरु केली ती थेट चिरे, बांबु, काजु अशा वाहतुकीसाठी त्याचा वापर झाला. परंतु एस.टी.वाचली पाहीजे चालु राहीली पाहीजे म्हणुन हातावर पोट असणार्या वाहतुकदारांनी सुध्दा याला विरोध केला नाही ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. १५ तारीख पासुन पुन्हा संचारबंदी सुरु झाली आहे. परंतु या संचारबंदीमध्येअनेक उद्योग व्यवसायांना शिथिलता दिली गेली आहे त्यामुळे ५० टक्के उद्योग व्यवसाय सुरु आहेत. कुडाळ एम.आय.डी.सी. मधील उद्योग सुरु असुन अनेक कामगारांनी कामगार पास काढले आहेत. पालकमंत्र्यानी आपल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक वहातुक व्यवस्था सुरु रहाणार असल्याबाबत सांगितले आहे. परंतु आपल्याकडुन तशी कोणतीही हालचाल दिसत नाही हे दुर्देव आहे. आपल्या आगारात संपर्कासाठी असलेले दोन्ही दुरध्वनी मृतावस्थेत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कसा संपर्क करावा ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावीच लागेल.आपली संस्था व्यावसायिक आहे हे आपण सोयास्कररित्या विसरला आहात. अशा आशयाचे निवेदन देण्यात या निवेदनात खालील मागण्याही करण्यात आल्या.

 

१.प्रवाशांना संपर्कासाठी सकाळी ६.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत एखादा मोबाईल किंवा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्या.

 

२.आपण किंवा आगारातील प्रशासकिय व्यक्तीनी एक कुडाळ आगाराचा ओनली ऍडमिन व्हॉअस्अप ग्रुप करावा त्यामध्ये सरपंच,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,पत्रकार,राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांना समाविष्ठ करावेत. यामुळे आपण प्रवाशांसाठी काही सकारात्मक निर्णय घेतलेच तर ते संपुर्ण तालुक्यात काही क्षणात पोचतील.

 

३.कोराना परिस्थिती कधी आटोक्यात येईल ते सांगता येत नसल्याने किमान गोर गरिब प्रवाशांसाठी काही मार्गावरच्या फेऱ्या कायमस्वरुपी चालु ठेवाव्यात.

 

४.कुडाळ रेल्वे स्टेशन मध्यवर्ती असल्याने रेल्वेच्या वेळा पत्रकाप्रमाणे मालवण व वेंगुर्ला फेर्या कायम स्वरुपी ठेवाव्यात.

 

५.सर्व कामगार पासना किमान २० दिवसाची मुदत वाढवुन मिळावी. महामंडळाच्या कारभाराबाबत लिहिण्यासारखे खुप आहे झोपलेल्याला जागे करणे सोपे असते परंतु झोपेच सोंग घेणाऱ्यांना जागे करणे कठीण असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर ,कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे ,ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल ,अवधूत सामंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा