बांदा
दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळांमधून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते पण चालूवर्षी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना घरातूनच हा दिवस ऑनलाईन पध्दतीने बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करुन शाळापातळीवर साजरा करण्यात आला. या दिवशी स्पर्धात्मक स्वरुपात घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपले विचार घरातूनच व्यक्त करून महामानवाच्या जीवनकार्याचा उलगडा केला.
आॉनलाईन स्वरुपात घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे गट क्र.१ पहिली ते दुसरी
सर्वोत्तम-नील नितिन बांदेकर ,प्रथम-सानिका आत्माराम नाईक, द्वितीय-सर्वेक्षा नितीन ढेकळे, तृतीय- दुर्वा दत्ताराम नाटेकर
गट क्र. २ तिसरी ते चौथी
सर्वोत्तम-किमया संतोष परब,प्रथम-आर्या पिराजी शिंगडे,द्वितीय-(विभागून) -नैतिक निलेश मोरजकर व शुभंकरसूर्यकांत वराडकर ,तृतीय-(विभागून) संयुक्ता संदीप वायंगणकर व नेहा विजय शंभरकर,चतुर्थ-शिवानंद संतोष परब,पाचवा-चिन्मयी सुरेश रूबजी
गट क्र. ३पाचवी ते सातवी
सर्वोत्तम-वेदांत संदीप सावंत,
प्रथम-सारा साहिद शेख,द्वितीय-सिमरन सुधीर तेंडोलकर, तृतीय-स्नेहा सचिन निंबाळकर ,चतुर्थ-शौर्य राजेन पाटील, पाचवा-धीरज सतिश पटेल
या स्पर्धेचे परीक्षण कुणकेरी नं. १ शाळेच्या शिक्षिका नीता सावंत व मणेरी नं.४ शाळेचे उपशिक्षक आमित पाटील यांनी केले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,सरपंच अक्रम खान, केंद्र प्रमुख संदिप गवस ,विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व पालकांनी अभिनंदन केले आहे. गेले वर्षभर शाळा बंद असल्या तरी थोर नेत्यांची जयंती ,पुण्यतिथी तसेच विशेष दिन आॅनलाईन स्पर्धात्मक स्वरुपात बांदा केंद्र शाळेच्या वतीने यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक श्री जे .डी. पाटील ,रंगनाथ परब, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस यांनी परिश्रम घेतले.