सध्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये दिवसेदिवस करोनाचा फैलाव जोरात होत असून, मुंबईला पाठवलेल्या ड्राइवर ची मुंबई वरून आल्या वर कुठल्या प्रकारची काळजी घेतली जात नसून, त्यांना ड्युटी वर कुठल्याही प्रकारची टेस्ट न घेता किंवा घेतली गेल्यास रिपोर्ट यायच्या आत त्यांना जबरदस्तीने कामावर पाठवले जात आहे.
असें कर्मचारी जेव्हा बसेस घेऊन प्रवासी वाहतूक करतात तेव्हा त्यांना करोना झालेला असल्यास तो प्रवाश्यांना होणे सहज शक्य आहे, फक्त पैसे कमवायचा नादात हा विभाग नियंत्रक सगळ्या डेपो च्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत आहे
आधीच रिटायर्ड झालेल्या अकार्यश्रम अधिका-याला महामंडळ का पोसतोय हेच समजत नाही.
हा अधिकारी कोणाचा जावई आहे, ह्याचा शोध लावणे गरजेचे झाले आहे
महामंडळला कडे पैसा नाही, सध्या गाड्या चालवायला, अश्या परिस्थिती मध्ये या बिन कामी बुजगावण्याला का बसवलाय खुर्ची वर?
अश्या अधिका-या वर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केली आहे.