कडक पोलीस बंदोबस्त असूनही नाहक वर्दळ सुरुच
बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
सावंतवाडी
राज्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना ची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अर्थात पंधरा दिवसांसाठी संचार बंदी चे कडक निर्बंध घातलेले असतानाही नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. विनाकारण फिरण्यास सप्त मज्जाव असतानाही सावंतवाडी शहरात या संचार बंदीचा फज्जा उडालेला दिसत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून पोलिसांकडूनही विनाकारण करणार्यावर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी संचार बंदीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.