अकोला
जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोविड लसीकरण उत्साहात सुरू आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत लस सुरक्षित ठेवण्यासाठी ‘आईस लाईंड रेफ्रिजरेटर’ (आयएलआर)ची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत अकोला मंडळाला आणखी २२ ‘आयएलआर’चा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी विभागासाठी ८२ आयएलआर पुरविण्यात आले होते. गुरुवारी हे आयएलआर अकोल्यात दाखल होण्याची शक्यता असून, ते मिळताच आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत गुरुवारी पाचही जिल्ह्यात आयएलआरचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.