रुपेश राऊळांनी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष; पर्यायी दोन जागा निश्चित…
सावंतवाडी
येथील हेल्थ फार्म परिसरात सुरू करण्यात आलेल्या “कोविड सेंटर” मध्ये पाण्याची समस्या आहे.याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच शेर्ले येथै कोविड सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.त्यानुसार येत्या दोन दिवसात त्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू कराव्यात,अशा सूचना श्री.सामंत यांनी दिल्या आहेत.
याबाबतची माहिती श्री.राऊळ यांनी दिली. ते म्हणाले,हेल्थ फार्ममध्ये जे सेंटर सुरू करण्यात आले, त्या ठिकाणी पाण्याचा मोठी समस्या आहे.त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी व्यवस्था करा, अशी त्यांनी मागणी केली.त्यानुसार आपण श्री. सामंत यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी तात्काळ दोन दिवसात कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.