नवी दिल्ली
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने मोठी घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बारावीची परीक्षा 4 मे रोजी होणार होती. सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी महाराष्ट्रातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर राहुल गांधींनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली होती. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. दहावीची परीक्षा पूर्ण रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दहावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच बारावीची परीक्षा तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक वाढला असून गेल्या 24 तासात 1 लाख 85 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.