नेत्र बोलती शब्दांविना,
बोल कळती मनाचे मनाला.
अबोल तू अबोल तुझी प्रित,
अबोल ओठ अधीरता कानाला.
धडकन तुझ्या हृदयाची,
ऐकू येते सख्या साजनाला.
साद तुझ्या अंतर्मनाची,
छळते पियाच्या हृदयाला.
न बोलताही कळे सारे,
नयन इशाऱ्याने बोलती.
ओघळणारे अश्रू गालावरचे,
भाव मनीचे मांडून जाती.
शब्द शब्द रुसला अंतरी,
स्पर्श जरी न झाला तनाला.
वनवास हा शब्दांचा न जाणो,
संपणार कधी हे ज्ञात कुणाला?
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६