वैभववाडी
दिगशी गावात चार दिवसात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मात्र संबंधित यंत्रणा अजूनही सुशेगाद आहे. आणखी किती बळी प्रशासनाला हवे आहेत. असा संतप्त सवाल भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला आहे.
दिगशीत कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. सदर महसूल गाव कंटेनमेंट झोन जाहीर करा. अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. नागरिकावर संबंधित कोणत्याही यंत्रणेचा अंकुश नसल्याने हे चित्र दिगशीत दिसत आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.तात्काळ उपाययोजना न झाल्यास यंत्रणेच्या विरोधात आवाज उठवणार असे नासीर काझी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.प्रत्येकाने मास्क चा वापर करा. घरी थांबा, विनाकरण बाहेर पडू नका, आजाराची कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःची काळजी स्वतः घ्या. असे आवाहन ही श्री काझी यांनी नागरिकांना केले आहे.