You are currently viewing सागरतट –  काव्यप्रकार :- हायकु

सागरतट – काव्यप्रकार :- हायकु

सागरतट,

होतात तिचे भास,

सूर्यास्त खास.

 

समुद्री लाटा,

चमकणारे तारे,

वाळूच्या वाटा.

 

पांढरी वाळू,

लाटांचा स्पर्श नवा,

तरीही हवा.

 

किनाऱ्यावरी,

भेट होई लाटांची,

काही क्षणांची.

 

अंतरी सुख,

भेटताची किनारा,

अंगी शहारा.

 

आस भेटीची,

पुन्हा जागे नव्याने,

आतुरतेने.

 

लाट सुखाची,

धाव घेते किनारी,

भेट प्रेमाची.

 

आतुरमन,

भेटीने सुखावते,

काहीच क्षण.

 

जाता माघारी,

अश्रू भरले डोळे,

कुणा नकळे.

 

(दिपी)✒️

दीपक पटेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा