सिंधुदुर्गनगरी
यापूर्वी कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या आदेशांमध्ये पुढील अत्यावश्यक सेवांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गोसेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान संबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते.
पुढील खाजगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि सेबीशी सलग्न संस्था व वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कार्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ, रिजर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आणि रिजर्व बँकेकडून नियंत्रित वित्तीय संस्थांची कार्यालये. सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व अधिवक्ता वकिल यांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस, औषधी, जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक) यांचा समावेश आहे. मात्र या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भारत सरकारच्या निकषानुसार तात्काळ लसीकरण करणेत यावे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत 15 दिवस वैध असलेले कोरोना निगेटीव्ह आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजेन टेस्ट प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल. या नियमाचे उल्लंघन केल्यास रु. 1 हजार दंड आकारण्यात येईल.
ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील, त्यांना अधिकृत तिकिट स्वतः जवळ बाळगावे लागेल, जेणेकरून तो संचारबंदीच्या कालावधीत विमानतळ, बसस्थानक, रेल्वे स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्रांच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत तसेच शुक्रवार ते सोमवार या संचारबंदी कालावधीत, कामाच्या पाळ्यानुसार त्यांच्या खाजगी वाहने, खाजगी बसेस द्वारे ये, जा करता येईल. सर्व नागरिकांच्यासाठी प्रार्थना स्थळे, धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक किंवा सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशातील नियंमांचे पालन करून त्यास परवानगी असेल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस, परीक्षेसाठी हजर राहणेसाठी तसेच रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर प्रवेशपत्र स्वतः जवळ बाळगून प्रवास करणेस परवानगी असेल. कंटेन्मेंट झोन व हॉट स्पॉटबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.
वरील आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.