*आ. वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा*
ओरोस :
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आज भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याबाबत आ. वैभव नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांच्या समवेत चर्चा केली. लवकरात लवकर हा ऑक्सिजन प्लांट सुरु केला जाईल असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी कोविड रुग्नांना दिल्या जाणाऱ्या सुविधा,जेवण, पाणी, रेमडेसिवीर इंजेक्शन ची उपलब्धता, कोविड सेंटर मधील सुविधा, विलगिकरण व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा, कोविड लसीचा पुरवठा याबाबत डॉ. अपर्णा गावकर यांच्याकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला. वाढत्या कोविड रुग्नांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आ. वैभव नाईक यांनी केल्या. याप्रसंगी ओरोस जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शाम पाटील, फार्मासिस्ट अनिल देसाई, व इतर आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.