सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके यांनी केलेल्या आवाहनानुसार सिंधुदुर्गातील सर्व प्रकारची दुकाने बहुतांशी तालुक्यात उघडली आहेत
आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या शब्दावर व्यापाऱ्यांनी विश्वास दाखविला आहे लॉकडाऊन चुकीच्या गृहितकावर आधारित आहे या लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे
यामुळे हे लॉकडावून मागे घ्यावे कोरोना हा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पसरत आहे हे लक्षात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापाऱ्याने लॉक डाऊनलोड असहकार्य दर्शवले होते
कोणत्याही परिस्थितीत सोमवारपासून सर्व व्यापारी सर्व प्रकारची दुकाने उघडतील असे जाहीर करण्यात आले होते सिंधुदुर्गातही व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके यांनी सिंधुदुर्गातील सर्व प्रकारची सर्व दुकाने उघडतील कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळले जातील असे जाहीर केले होते
त्या पाठोपाठ कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास संघर्ष अटळ अशा शब्दात व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आज अखेर सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू केली आहे