कणकवली
मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी – मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .
या घटनेमुळे गाडी तब्बल दीड तास घटनास्थळी थांबून होती . दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गवारेड्याला बाजूला केले.त्यानंतर गाडी नियोजितस्थळी मार्गस्थ झाली.