दोडामार्ग / सुमित दळवी
दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रथमेश सावंत यांनी आपल्या वैयक्तिक कारणावरून सदस्य व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
आपण गेली तीन वर्ष या पदावर कार्यरत असून या नंतर आपल्याला या पदावर वैयक्तिक कारणामुळे काम करता येणे शक्य होणार नसल्यामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. राजीनामा पत्र त्यांनी सरपंच संदीप नाईक यांच्याकडे सुपूर्त केले आहे तसेच सरपंच सेवा संघाच्या तालुक्यातील प्रसिद्धीप्रमुख या पदाचा ही त्यांनी राजीनामा दिला असून तो राजीनामा तालुकाप्रमुख सरपंच सेवा संघटना दोडामार्ग यांच्याकडे सुपूर्त करताना वैयक्तिक कारणामुळे आपण काम करू शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.