You are currently viewing माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी दिली “रेमडेसीवीर” इंजेक्शन
जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे ही इंजेक्शन देतांना डॉ.मिलिंद कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी दिली “रेमडेसीवीर” इंजेक्शन

सिंधुदुर्ग जिल्हयातील कोरोना रुग्णांसाठी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी दिली “रेमडेसीवीर” इंजेक्शन

व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाला हे इंजेक्शन देते जीवदान

जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे इंजेक्शन केली सुपूर्द, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयासाठी “रेमडेसीवीर” इंजेक्शन दिली आहेत. कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे आणि त्या रुग्णांचे जीव वाचविणारे हे प्रभावी औषध आहेत. महागडे असलेल्या या इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा आहे. अशा स्थितीत सिंधुदुर्ग च्या रुग्णांना ही इंजेक्शन उपलब्ध करून दिल्या बद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनाने खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत. या पूर्वी आम.नितेश राणे यांनी हीच रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली होती.

रेमडेसीवीर इंजेक्शनची जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली आहे. महागडे असलेल्या या इंजेक्शनचा देशात सर्वत्र तुटवडा आहे. मुंबईत सुद्धा हे इंजेक्शन मिळाले नसल्याने अनेकांना या पूर्वी प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णाला हे इंजेक्शन दिल्यास रुग्णाचा मृत्यू टळतो. त्यामूळेच कोरोनामुळे आपल्या जिल्हातील कोणाचाच बळी जावू नये म्हणून माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी जिल्हासाठी अशी इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.

आज १७ ऑगस्ट रोजी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती ही इंजेक्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे ही इंजेक्शन देतांना डॉ.मिलिंद कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा