म्हापण
म्हापण येथील श्री. शांतादुर्गा देवीचा १३एप्रिल रोजी साजरा होणारा गुढीपाडवा यात्रोत्सव यावर्षी covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शांतादुर्गा , खवणे श्वर, सिद्धेश्वर व ब्राह्मण देव मंदिर देवालय ट्रस्ट स्थापन करून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शांतादुर्गा देवीचा यात्रोत्सव गुढीपाडव्याला साजरा होतो. या उत्सवात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा हा उत्सव १३एप्रिल रोजी साजरा होत आहे तथापि करुणा संक्रमणाची दुसरी लाट रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. शासनाच्या आदेशाचा आदर करीत व नियमांचे पालन करून यंदाचा गुढीपाडवा यात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे फक्त धार्मिक विधी केले जाणार आहेत यात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असल्याने व्यापार व्यवसायिकांना बंदी घालण्यात आली आहे तसेच अन्य कारणाने मंदिरात अथवा मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व भाविक व व्यावसायिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.