You are currently viewing विचार मनातले

विचार मनातले

 

 

कुठंवर सांभाळायचं…

कधीतरी सोडून द्यायचं…

     मनातल्या विचारांनाही,

     एकदा स्वतंत्र करायचं.

बांधून दाबून जबरदस्ती,

कुणी राहत नसतं मनात.

    विचार कसे असतील वेगळे,

    त्यांनाही फिरू द्या रानात.

 

मौज मजा ही तर आता,

प्रत्येकाची पहिली पसंती.

    मन मारून राहतात घरात,

    खरी आवड त्यांची भटकंती.

 

विचारांचंही मन असावं,

भावना त्यांनाही असतील.

    उगाच का पळतात सैरावैरा,

    अविचार त्यांनाही सतावतील.

दाही दिशा फिरल्यावर,

समजेल बाहेरचं जग.

     कोण नसतं कुणाचं म्हणत,

     फिरतील स्वतःच माघारी मग.

(दिपी)✒️

दीपक पटेकर

८४४६७४३१९६

This Post Has One Comment

  1. Dr. Manisha

    खूपच छान कविता… मनाला भिडणाऱ्या….. बोचणाऱ्या…… विचार करायला भाग पाडणाऱ्या…. मनाला उभारी देणाऱ्या….. अप्रतिम कविता संग्रह

प्रतिक्रिया व्यक्त करा