नको आरशात तू तुझा चेहरा पाहू,
साठवला मी तो माझ्या नयनात आहे.
तुला आठवूनी डोळे मिटूनी घ्यावे,
जादू सारीच तुझ्या रुपात आहे.
नको दूर करू तू त्या नाजूक बटा,
गालाशी झोंबण्याचा हक्क त्यांचा आहे.
गालावरची खळी तुझ्या बोलते मनाशी,
असे अतूट नाते खळी मनाचे आहे.
नको अडवू तू फिरण्या तुझ्या मनाला,
खजिना गुपितांचा मनात दडला आहे.
वेड्यापिशा मनाला ओढ पियाची वाटे,
ये तू लवकरी प्राण कंठात दाटला आहे.
(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६