You are currently viewing शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील माध्य- व उच्च माध्यमिक शाळा बंदचा निर्णय तातडीने घ्यावा-

शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील माध्य- व उच्च माध्यमिक शाळा बंदचा निर्णय तातडीने घ्यावा-

शिक्षक भारतीची जिल्हाधिकारी व माध्य- शिक्षणाधिकारी यांच्याकडे विनंती

सिंधुदुर्ग

आज दि.५ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा व कॉलेज दि 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.(इ.१०वी व इ.१२वी बोर्ड परीक्षा वगळता) अशाप्रकारे मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना आज कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली दिसुन येत होती. मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे की नाही ? या विवंचनेत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक पडलेली असून याबाबत जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना तातडीने निर्णय घेऊन योग्य ते मार्गदर्शन माध्यमिक शाळा करावे अशी विनंती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव सुरेश चौकेकर यांनी जिल्हाअधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे केल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर व राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या विनंती पत्रात राज्य शासनाप्रमाणे जिल्हास्तरावर त्वरीत निर्णय घेतले जावेत व तशाप्रकारे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना आदेश निर्गमित व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
या विषयाबाबत योग्य निर्णय घेऊन आपल्या स्तरावरुन संभ्रम अवस्थेत असलेल्या शाळां काॅलेजना सूचना तातडीने निर्गमित होणे अत्यंत आवश्यक आहे असेही नमूद करण्यात आले असून, वरील विषयाबाबत तातडीने सूचना/आदेश निर्गमित व्हावेत अशी विनंती शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर सचिव सुरेश चौकेकर यांनी जिल्हाअधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना ईमेलने पाठविलेल्या पत्रात मागणी केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा